Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
दुसरबीडच्या जीवन विकास विद्यालयाची भारती भोसले पोलीस भरती परीक्षेत राज्यात प्रथम

सिंदखेडराजा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे :- दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालयाची भारती कैलास भोसले हिने महिला पोलीस भरती परीक्षेत राज्यातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे यावेळी जीवन विकास विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता भारतीचे मूळ गाव ताडशिवनी असून तिचे 5 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण जीवन विकास विद्यालयात पूर्ण झाले होते मिरा भाईंदर येथे 1400 मुलींना मागे टाकत प्रथम तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे यावेळी प्राचार्य जी. व्ही. भांगे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला उपप्राचार्य पी. डी गायके वडील कैलास भोसले जी. एस देशमुख प्राध्यापिका श्रीमती भोसले शिक्षिका पिंपरकर डी. जी राजे उपस्थित होते