तिने दुसर्या प्रियकराच्या मदतीने काढला पहिल्या प्रियकराचा काटा…
पोलिसांनी खाकीचा इंगा दाखविताच केली खुणाची कबुली

लोणार-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- राहुल सरदार:- खून करणे एवढे सोपे झाले आहे का ? कुठलाही विचार न करता असे टोकाचे पाऊल उचलले योग्य आहे का ? असे म्हणतात की एका म्यानित दोन तलवारी बसू शकत नाही किंवा एका फुलावर दोन माळी हक्क गाजवू शकत नाही त्याचप्रमाणे एका प्रेयसीचे दोन प्रियकर होऊ शकत नाही याच घटनेचा प्रत्यय उदाहरण लोणार येथील घातपातात दिसून आले आहे.
पहिला प्रियकर हा अडसर करत असल्याने दुसऱ्या प्रियकरच्या मदतीने पहिल्या प्रियकराचा गळा दाबून खून केल्याची घटना लोणार सरोवरा मध्ये उघडकीस आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सरोवरतील यज्ञनेश्वर मंदिरा जवळील दर्गा रोड बाजूला घनदाट जंगलात सेलू जी. परभणी येथील त्या २८ वर्षीय युवकाचा गळा दाबून खून केल्याची घटना दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजे दरम्यान उघडीस आली होती यामुळे लोणार शहरात एकच खळबळ उडाली होती.
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील २८ वर्षीय युवक अर्जुन दिलीप रोडगे रा.रवळगाव (मृतक ) हा दि. २ ऑगस्ट पासून घरी न आल्याने त्याचे वडील दिलीप बाबाराव रोडगे यानी सेलू पोलीस स्टेशन ला बेपत्ता झाल्याची ३ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली. सेलू पोलिसांनी तपासाचे चक्रे जलद गतीने फिरविली असता. मृतक अर्जुन रोडगेचे गावातीलच २९ वर्षीय अर्चना विठ्ठल सरोदे या महिलेशी अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन. तांत्रिक तपास व पोलिसी खाक्या दाखवीताच ती पोपटा सारखी बोलू लागली. तिने दुसऱ्या प्रियकराच्या मदतिने आपल्या पहिल्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.
सदर खून लोणार सरोवरात करून मृतदेह घनदाट जंगलातील जाळीत फेकून दिल्या ची माहिती पोलीसांना देताच सेलू पोलीसाचे पथक दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता महिला आरोपी अर्चना सरोदे हिला घेऊन लोणार ला दाखल झाले नंतर रात्रीच्या काळोख्या अंधारात सरोवरात घटनास्थळावर घेऊन आले असता तिने मृतक अर्जुन चा मृतदेह कुठे नेला व खून कुठे केला हे पोलीसांना दाखविले तिने दुसरा आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली आहे लाजी डुकरे वय २४ रा. खडुळा ता. पाथरी जी. परभणी यांच्या मदतीने मृतक अर्जुनचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. मृतक अर्जुन व महिला आरोपी यांनी लोणार सरोवर फिरायला जाण्याचा बेत आखला व २ ऑगस्ट रोजी स्कुटीने लोणार सरोवरात आले त्या नंतर रीतसर सरोवच्या गेट वर नोंदणी केली त्या नंतर आता मध्ये दर्गा रोडने जाणाऱ्या पाऊल वाटेने जाऊन चिंचेच्या झाडाखाली बसले या नंतर दोहेही निवांत बसले असता त्यांचा वर पाळत ठेऊन असलेल्या एका दुसऱ्या आरोपी त्याचा गळा दाबून खून केला या नंतर महिलेला समोर पाठवून त्या मृतदेहाला फरफटत नेले जंगलातील झाडीत फेकून दिले व नंतर वरती येऊन स्कुटी ने परत निघाले स्कुटी ढोकसाळ तालुका मंठा या गावाच्या समोर सोडून तिथून निघून गेले त्या नंतर पोलिसांनी फिरवलेल्या तपास चक्राच्या आधारावर खुनाचा गुन्हा उघडकीस आला .गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मागर्दशनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अशोक जटाळ हे करीत आहेत
या वेळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस कर्मचारी अजय रासकटला, मनोहर कोपणार, सोपान दुबे,अनिल शेवाळे, अमोल वाडेकर ज्ञानेश्वर जानगर अनिल शेवाळे,माधव गोरे शेख इब्राहिम दिलीप गाडगे हे कर्मचारी कार्यवाही मध्ये सहभागी होते.
एवढ्या रात्री शेलू पोलिसांची चमू व वन्यजीव अभयारण्य चे अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले व दुसऱ्या दिवशी सरोवरातून मृतदेह वरती आणण्यात आला त्या नंतर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले
वन्यजीव विभागाकडून आलेल्या पर्यटकांची सरोवरात जात असताना रीतसर नोंदणी होते मात्र परत येताना पर्यटकाची नोंद होत नाही त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे निदर्शनास येत असून पर्यटकांचे परतीची सुद्धा नोंद व्हावी अशी पर्यटक प्रेमी यांची मागणी आहे