भगवा सप्ताहात शिवसैनिक जाताहेत घरोघरी..
सामान्य माणसाची ताकद आणि निष्ठेचे बळ उद्धव ठाकरे साहेबांसोबत - जालिंदर बुधवत

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- लोकसभा निवडणुकीने राज्यातील जनता ही महाविकास आघाडी सोबत असल्याचे दिसून आले. विधानसभेतही हेच चित्र कायम राहणार आहे. भगवा सप्ताहात शिवसैनिक गावोगावी घरोघरी जाऊन भेटी गाठी घेत आहेत. निश्चितच सामान्य माणसाची ताकद आणि शिवसैनिकांच्या निष्ठेचे बळ उध्दव ठाकरे साहेबांसोबत असून विधानसभा निवडणुकीत “मशाल” विजयी इतिहास घडवणार असा ठाम विश्वास शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केला. यावेळी संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर, मुंबई येथून आलेले बुलडाणा विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र रावराणे, महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ चंदाताई बढे, संदिप शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सूचना केल्या होत्या. त्यामुळे ४ ऑगस्ट पासून बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवा सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.या भगव्या सप्ताह अंतर्गत शिवसेना सदस्य नोंदणी करणे, बूथ प्रमुखांची नेमणूक करून त्यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे, नवीन मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या दृष्टीने तसेच अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नवविवाहित आणि ज्यांची नावे लोकसभेत मतदार यादी मध्ये काही कारणास्तव वगळण्यात आली आहेत किंवा यंत्रणेच्या चुकीमुळे डिलीट झालेले आहेत त्यांची नावे पुन्हा एकदा मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी बी एल ए यांच्यामार्फत काम करून घेणे, त्याचप्रमाणे ८५ वर्ष वरील मतदारांच्या संदर्भामध्ये नाव नोंदणी आणि माहिती गोळा करणे. सोबतच गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या अभियानाला गती देण्यात येत आहे. या भगवा सप्ताहमध्ये ४ ऑगस्ट रोजी सावळा सुंदरखेड जि प सर्कल मध्ये पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. डोंगर खंडाळा येथे सभा देखील पार पडली. दुपारी देऊळघाट जिल्हा परिषद सर्कल मध्ये पदाधिकाऱ्यांचा ताफा पोहचला. कोलवड येथे श्री स्वयंप्रकाश महाराज मठ परिसरात कॉर्नर सभा घेण्यात आली. ५ ऑगस्ट रोजी मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये – बुधनेश्वर, मढ या भागात गावकऱ्यांशी संवाद साधण्यात आला तर ६ ऑगस्टला पिंप्री गवळी जिल्हा परिषद सर्कल, ७ ऑगस्टला रोहीणखेड जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिवसेना पदाधिकारी यांनी जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात भगवा सप्ताह अंतर्गत भेटीगाठीचे सत्र राबविले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी जालिंदर बुधवत यांनी केले.
यावेळी अपंग सेल चे जिल्हा प्रमुख रामदास सपकाळ, उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, मा तालुका प्रमुख डॉ मधुसुधन सावळे, किसान सेना उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, युवासेना उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, शुभम घोंगटे, उप तालुका प्रमुख विजय ईतवारे , संजय गवळी, बबन खरे, एकनाथ कोरडे, ओमप्रकाश नाटेकर, मोहम्मद सोफियान, संजय शिंदे, राजू मुळे, ओमप्रकाश बोर्डे, संदिप बाजीराव पाटील, सुधाकर सुरडकर, रामशंकर सोनुने, राजू बोरसे, मुकुंद क्षीरसागर यांच्यासह जिहा परिषद सर्कलमधील शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.