बुलडाणा शहरातील तेलंगी समाजाच्यावतीने आमदार श संजय गायकवाड यांचा भव्य सत्कार संपन्न
तेलंगी समाजाच्या समाज मंदिरासाठी ५० लाख रुपयाचा भरिव निधी मंजूर..!

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-दिनांक २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्त्याने शहरातील राजे संभाजीनगर परिसरातील दत्त मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना समाजमंदिरासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले होते….
त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन तेलंगी समाजाच्या समाज मंदिरासाठी ५० लक्ष रुपयाचा भरीव निधी उपलब्ध करून देऊन आपल्या आश्वासनाची वचनपूर्ती केली, त्याबद्दल बुलढाणा शहरातील समस्त तेलंगी समाज बांधवांच्यावतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गायकवाड यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला..
यावेळी त्या ठिकाणी सोबत महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारणी सदस्य युवानेते संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओम सिंग राजपूत, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे यांच्यासह बुलढाणा शहरातील तेलंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…