टिटवी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साह साजरा

लोणार-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-यासीन शेख:- आदिवासी बहुल गाव टिटवी येथे 9 आॅगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साह साजरा करण्यात आला.यावेळी बिरासा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आली.
भारतीय आदिवासी पँथर संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गजानन कोकाटे यांच्या तर्फे मा. उपसरपंच दशरथ कोकाटे, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र कोकाटे, गजानन गिते,शंकर कोकाटे,विष्णू तुनपुरे, राम माघाडे ग्रा. सदस्य यांच्या हस्ते तरुण युवा मंडळींना टी शर्ट वाटप करण्यात आले. नंतर तरुण युवा मंडळींनी आपापल्या गाडीला झेंडे बांधून व बिरासा मुंडा यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.जागतिक दिन साजरा करतांना टिटवी, नांद्रा ,रायगाव,गोत्रा येथील तरुण युवा वर्ग ,रावण युवा सेना 007 चे सर्व कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी आदिवासी युवा तरुण मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.