लोणार , मेहकर मधील २४ गावांमध्ये विकासकामांसाठी सहा कोटी मंजूर
आमदार संजय रायमूलकर यांनी निधीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश

लोणार: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-लोणार व मेहकर तालुक्यातील २४ गावांमध्ये सभामंडप बांधकाम आणि ६ गावांमध्ये सिमेंट रस्ते अशा सहा कोटी रुपयांच्या बांधकामांना ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आमदार संजय रायमूलकर यांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
लोणार तालुक्यातील देऊळगाव – कुंडपाळ येथील महादेव मंदिराजवळ सभामंडप बांधकाम, भानापूर येथील जुना मारुती मंदिर, चिंचोली सांगळे येथील गजानन महाराज मंदिर,सुलतानपूर येथील पशुपतिनाथ मंदिर, शाळा येथील मारुती मंदिर, ऑर्डर येथील गजानन महाराज मंदिर, कोयाळी सास्ते येथील मारुती मंदिर, वडगाव तेजन येथील गजानन महाराज मंदिर, मात्रखेड येथील गजानन महाराज मंदिर, पारडा दराडे व गुंघा येथील ग्रामपंचायतीच्या जागेत सभामंडप आणि सामाजिक सभागृहाचे बांधकाम होणार आहे.
लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे २० लाख रुपये खर्चुन बस स्थानकाच्या बांधकामास मंजुरी मिळाली आहे. येवती व कोयाळी येथील स्मशानभूमीचे सौंदर्याकरण, पळसखेड येथे मल्टीपर्पज हॉलचे बांधकाम, किन्ही येथे तांडा वस्तीमध्ये सिमेंट रस्त्याचे बांधकाम या कामांना मंजुरी मिळाली आहे. मेहकर तालुक्यातील साबरा दादुलगव्हाण, लोणी गवळी, सावंगी वीर, पार्डी (घुटी) सभामंडपाचे बांधकाम, परतापूर येथील तापेश्वर महादेव मंदिर, देऊळगावसाकर्शा येथील देवीमंदिर, चिंचोली बोरे येडेबाबा संस्थान, उकळी येथे देवीमंदिर, हिवरखेड येथील देवीमंदिर, कणका येथे आदिवासी, विठ्ठलवाडी येथे मागास वस्तीत सभामांडपांची कामे मंजूर झाली