बुलढाणा अकोला वाशीम निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीसाठी उपस्थित रहा- माजी आमदार राहुल बोंद्रे
कॉंग्रेस प्रदेश प्रभारी रमेशजी चेन्नीथला सह प्रदेशचे नेते बुलढाण्यात येणार

बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-विधानसभा २०२४ निवडणूकपूर्व तयारी कॉंग्रेच्या आढावा बैठकीचे आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी सहकार विद्यामंदिर सभागृह बुलढाणा येथे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकपूर्व तयारी आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश प्रभारी मा.श्री.रमेशजी चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनात प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी भा.रा.कॉ.कमिटीचे सरचिटणीस खा.मुकुलजी वासनिक, विधिमंडळ नेते आ.बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते विजयजी वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बुलढाणा अकोला व वाशीम जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीला बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे कि मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणूक पूर्वतयारी करिता बुलढाणा अकोला व वाशीम जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा या वेळी घेण्यात येणार आहे. बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिराचे सभागृहात ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत बुलढाणा,अकोला,वाशीम जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १ ते २ दरम्यान भोजन अवकाश व त्यांनतर दुपारी २ ते ३ वाशीम जिल्हा कॉंग्रेस कमिटी आढावा बैठक, दुपारी ३ ते ४ या वेळेत अकोला जिल्हा कॉंग्रेस कमिटी आढावा बैठक, सायंकाळी ४ ते ५ या वेळेत बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटी आढावा बैठक पार पडणार आहे.
विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीला उपरोक्त बुलढाणा,अकोला,वाशीम या जिल्ह्यातील कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, आजी माजी खासदार,आमदार, कॉंग्रेस कमिटी सदस्य, प्रदेश प्रतिनिधी व पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटनेचे पदाधिकारी, विभाग व सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांचे सदस्य आदी मान्यवरांनी या महत्वपूर्ण बैठकीला मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेत