मेहकर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नसल्यामुळे शेतकरी संतप्त.

मेहकर : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा अध्यापर्यंत पिक विमा मिळाला नसल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने कंपनीने बऱ्याच तक्रारी रिजेक्ट केल्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात व जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन व पिक विमा कंपनीच्या विरोधात काल शेतकऱ्यांनी संतप्त होत. आपल्या भावना व्यक्त केल्या व या सर्व शेतकऱ्यांनी तक्रारी घेऊन काल हेल्पलाइन सेंटर मेहकर येथे जनता दरबार मध्ये सांगितले की शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न गंभीर असल्याचा शेतकरी यांनी डॉ टाले यांना सांगितले. यावर तातडीने तालुका कृषी अधिकारी व पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून सर्व शेतकऱ्यांना घेऊन शेतकरी नेते डॉ. टाले शेतकऱ्यांना घेऊन तात्काळ तालुका कृषी अधिकाऱ्याचं दालन गाठत या शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात आक्रमक होत जाब विचारला व शेतकऱ्यांना यावर्षीचा खरीपाचा अग्रिम पिक विमा तात्काळ द्यावा अन्यथा पिक विमा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी व पिक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले की तुरीचा संपूर्ण पिक विमा तसेच रिजेक्ट केलेल्या तक्रारी शासन लवकरच मंजूर करून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देणार असल्याचे सांगितले. यावेळी राजमाता जिजाऊ सामाजिक फाउंडेशन चे अध्यक्ष ऋतुजा चव्हाण, ऋषांक चव्हाण, प्रफुल देशमुख, कैलास उतपुरे, जुबेर खान, महेश देशमुख गोपाळ सुरडकर, प्रवीण पाटील, अंकुश राठोड राजु कुसळकर शंकर गिरी, गजानन होनमने शरद देशमुख, विशाल देशमुख, गोपाल उंबरकर, राधाकिसन पवार, जगदीश पवार सह शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. पिक विमा मिळणार असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन कर्ते शांत झाले.