नातवाच्या नावाने आजोबांनी सुरू केलेल्या भंडाऱ्याची परंपरा आजही कायम…
श्रावण महिन्यात मोरे परिवाराकडून कोलवड येथे भंडाऱ्याचे आयोजन असंख्य भक्तांनी घेतला प्रसादाचा लाभ

बुलढाणा:-आपलं बुलडाणा जिल्हा बातमी:- श्रावण महिना आला की सर्व ठिकाणी भंडारा चे आयोजन मोठ्या प्रमाणात दिसून येते मात्र त्यामध्ये काही जेवणाचे भंडारे हे अनोखे असतात याचा प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सागवन येथे राहणाऱ्या श्री दादाराव मोरे यांचे आहे नातवाच्या नावाने सुरू केलेल्या या भंडाऱ्याला आज सहा वर्षे पूर्ण झाले मात्र ही परंपरा खंडित न पडता आजही कायम ठेवली असंख्य भक्तांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला. प्रचंड गर्दी या भंडाऱ्यामध्ये दिसून आली.
दादाराव मोरे राहणार सागवन यांनी गेल्या सहा वर्षापासून कोलवड येथे श्रावण महिन्यात सुखदेव भवन सामाजिक सभागृह कोलवड येथे त्यांचा नातू समर्थ याच्या नावाने भंडारा सुरू केला होता आज दि 15 ऑगस्ट 2024 या परंपरेला सहा वर्षे पूर्ण झाली मात्र दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात ते व त्यांचे परिवारातील सदस्य या भंडाऱ्याचे आयोजन करतात व असंख्य भक्तांना महाप्रसादाचा लाभ करून देतात दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आले.1 हजार ते दीड हजार लोकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या शुभ कार्याला त्यांचे व स्वामी समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष गजानन राऊत, दादाराव मोरे यांची मुले पवन मोरे जीवन मोरे व मुलगी सोनाली मोरे, शिवानी मोरे तसेच त्यांचे सहकारी मित्र प्रशांत गावंडे, मंगेश पन्हाळे अजय गावंडे, निखिल सोनवणे,राहुल पमनानी,जयेश कस्तुरे ,अजय राजगुरे आदी मित्र लोकांचा या शुभ कार्याला हातभार लागला.