तिरंगा देशाची शान, दुरंग्यापासून तिरंगा वाचवण्याचा संकल्प करा: जिल्हाध्यक्ष मा. आ. राहुलभाउ बोंद्रे
जिल्हा काँग्रेस मुख्यालय गांधी भवन येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

बुलढाणा,- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- हजारो शूरविरांच्या बलिदान, त्याग व संघर्षाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून तिरंगा डौलाने फडकत आहे. तिरंग्याची शान कायम ठेवत शेतकरी, कामगार, कष्टकरी, देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवान यांनी देश उभा केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात सुईचे उत्पादनही होत नव्हते पण पंडित नेहरुंच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वाने देशात प्रगतीचा पाया रचला आणि देश संपन्न झाला. ७८ वर्ष हा तिरंगा डौलाना फडकत आहे पण आता तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले.जिल्हा काँग्रेस चे ध्वजारोहण जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले तर गांधी भवन येथील ध्वजारोहण शहराध्यक्ष दत्ताभाउ काकस यांनी केले.
काँग्रेस कार्यकर्त्यांना देशाला संविधानाच्या वाटेवर घेउन जाण्यासाठी शपथ देण्यात आली. यावेळेस अ. भा. काँ. क. चे सचिव मा. आ. हर्षवर्धन सपकाळ, आमदार धिरजभाउ लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे,प्रदेश सचिव अॅड जयश्रीताई शेळके, जेष्ठ काँग्रेस नेते अॅड बाबासाहेब भोंडे, लक्ष्मणराव घुमरे, बाळाभाउ भोंडे, मिनलताई आंबेकर, संजय पांढरे, जिल्हा काँग्रेस संघटन सरचिटणीस सतिष मेहेंद्रे, प्रा. सुनिल सपकाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन बोंद्रे म्हणाले की,आजच्या दिवशी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संदेश देतात, ही परंपरा आहे पण मागील १० वर्षापासून लाल किल्ल्यावरुन राजकीय भाषणबाजी केली जात आहे. पंतप्रधानांनी आज आपल्या भाषणात शेतकरी, कामगार, देशाचे रक्षण करणारा जवान, बेरोजगारी या महत्वाच्या विषयांवर भाष्य केलेच नाही. गांधी-नेहरु कुटुंबावर टीका करताना भाजपामधील परिवारवादाकडेही पंतप्रधानांनी लक्ष द्यायला हवे. गांधी- नेहरु कुटुंबाने देशासाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले, त्याग केला आहे. या कुटुंबाने आपली संपत्तीसुद्धा देशासाठी दान केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ९ वर्षे जेलमध्ये काढले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठा संघर्ष केला पण २०१४ साली देशाला स्वातंत्र मिळाले असे माननारे काही लोक आहेत त्यामुळे स्वातंत्र्याचा खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची गरज आहे, असे जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले.
यावेळेस तालुकाध्यक्ष सुनिल तायडे, कार्याध्यक्ष नंदुभाउ शिंदे, प्रा संतोष आंबेकर, जाकीर कुरेशी, विनोद बेंडवाल, समाधान हेलोडे, मो. एजाज मो. मंजूर, सतिश पाटील, एकनाथ चव्हाण, शैलेश खेडकर, जोत्सनाताई जाधव, बानोबी चौधरी, डाॅ. पुरूषोत्तम देवकर, रखमाजी राउत महाराज, अनिल वारे ,प्रतिक जाधव, गणेशराव पाटील, गौतम बेगानी, अॅड प्रविण सुरडकर, अशोक जैस्वाल, सय्यद ईरफान, मोईन काझी, गौतम मोरे, सुरज सोनुने, शेख राजू, साहेबराव चव्हाण, शेरसिंग रबडे, वैभव चव्हाण, डाॅ. मोहन बाभुळकर, राजेश जाधव, सुनिल पनपालिया, विजय कड, मो. शफी आदींसह उपस्थित होते.