अंगणवाडी ताईंनी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला

लोणार- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-(राहुल सरदार)-स्थानिक तहसील कार्यालय येथे आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी अंगणवाडी ताईंनी आपला लाडका भाऊ मेहकर विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार श्री संजय रायमुलकर यांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार चे सभापती माननीय बळीरामजी मापारी, तहसीलदार भूषण पाटील, महिला संरक्षण अधिकारी सीमा खणपटे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे, पर्यवेक्षिका भिकाबाई सानप,मंगला निकस, उज्वला शिंगणे, विद्या नव्हाळे तसेच अंगणवाडी सेविका शोभा भोकरे, पुष्पा बनकर, नंदा बच्छीरे, संगीता मोरे,अंजली परिहार,सत्यशीला टकले, दुर्गा भानापुरेसह उपस्थित होत्या. रक्षाबंधनाची भेट म्हणून शासनाकडे अंगणवाडी सेविका यांना 20000 प्रति महिना मानधन लागू करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी आपला लाडका भाऊ आमदार डॉ संजय रायमुलकर यांच्याकडे केली आहे.