रक्षाबंधनाच्या निमित्ताने बुलढाण्याचे बाजारपेठ सजली….
आपल्या लाडक्या भावाला राखी खरेदीसाठी बहिणींची गर्दी...

बुलढाणा -आपलं बुलडाणा जिल्हा बातमी:- बहिण भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन..रक्षाबंधन चे महत्त्वाचं वेगळं आहे.राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. यालाच रक्षाबंधन असे म्हणतात रक्षाबंधनाच्या सणानिमित्त बुलढाणा शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. राखी खरेदी करण्यासाठी बहिणी वर्ग गर्दी करत आहेत. सोमवारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार असल्याने बाजारात खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत.
उद्या रक्षांबधन आहे. रक्षाबंधनाच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. बाजारात वेगवेगळ्या स्वरूपाच्या राख्या उपलब्ध आहेत. तसेच राखी खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. बुलढाणा शहरात देखील रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत. बाजारात रंगीबेरंगी राख्या उपलब्ध आहेत. अवघ्या काही तासांवर रक्षाबंधनाचा सण येऊन ठेपला आहे. उद्या 19 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. त्यामुळे दोन्ही सणांची खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
बुलढाणा शहरातील बाजारपेठा रक्षाबंधनाच्या निमित्ताने रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठ सजली असून महिला वर्ग आपल्या लाडक्या भावाला राखी खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. सोमवारी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. त्यामुळे बाजारात खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या दाखल झाल्या असून संपूर्ण बाजारपेठ विविध राख्यांनी फुलली आहे. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात अनेक राखी विक्रेत्यांनी दुकाने मांडली असून वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत.रक्षाबंधन निमित्त लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या विविध कार्टूनच्या राख्या देखील बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. बाजारात रुद्राक्ष, मेटॅलिक डायमंड, नेकलेस, धागा, गोंडा, सिल्वर मनी, यासह छोटा भीम, डोरेमॉन यांसारख्या विविध प्रकारच्या कार्टून राख्या देखील विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत
लाडक्या भावांना नक्की कोणत्या प्रकारची राखी खरेदी करू शकतो, यासाठी महिला वर्गाची धावपळ सुरु आहे. शिवाय नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त विविध वस्तू खरेदी करण्यासाठी देखील महिला बाजारात गर्दी करत आहे अवघ्या काही तासांवर रक्षाबंधनाचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे सणाची खरेदी करण्यासाठी महिलांची लबगल सुरु आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.