Homeबुलढाणा (घाटावर)
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विवेकानंद विद्या मंदिर लोणार च्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड…

लोणार :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- प्रतिनिधी. यासीन शेख :- तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा अनुजाती, जमाती समाजकल्याण शाळा लोणार येथे घेण्यात आली.त्यात लोणार शहरातील विवेकानंद विद्या मंदिर च्या कु. दृष्टी नटराज सोळंके व स्वरूप सत्यनारायण दूधमोगरे या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहलता कुळकर्णी यांनी पुढील जिल्हास्तरीय फेरी साठी सदर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.