रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करा-सकल मुस्लिम समाज तर्फे मागणी

लोणार :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- दोन समाजात जाणून बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी असे निवेदन सकाळी अकरा वाजता जामा मस्जिद चौक येथून पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढून सकल मुस्लिम समाज तर्फे आज तहसीलदार यांना देण्यात आले.
रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी पांचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताह दरम्यान उपस्थित जनसमुदायासमोर इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलै व सल्लमची प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक वक्तव्य केले. गुरु नारायण गिरी महाराज यांनी हिंदू-मुस्लिम समाजात जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी.असे निवेदन समस्त मुस्लिम समाज तर्फे देण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येत मुस्लिम सहभागी झाले होते.