मलकापूर येथील भव्य दिव्य अभ्यासिका लवकरच कार्यान्वित होणार :- आमदार राजेश एकडे

मलकापूर:_ आपलं बुलढाणा जिल्हा बातमी(करण झनके):- मलकापूर शहरासह तालुक्यातील मुलांचे भविष्य घडविणारा महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजे सर्व संयुक्त निर्माण होत असलेली अभ्यासिका सदर अभ्यासिकेचे काम पूर्णत्वास गेले असून लवकरच लोकार्पण सोहळा होऊन विद्यार्थ्यांच्या सेवेत सुरू होणार आहे याची पाहणी आज लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्री राजेश भाऊ एकडे यांनी केली
ही अभ्यासिका मुलांचे भविष्य घडवनारी असून यामुळे अनेक अधिकारी तयार होणार आहेत या अभ्यासिकेचा फायदा गोरगरीब विद्यार्थ्यांना होणार असून आमदार श्री राजेश भाऊ एकडे यांनी मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून ही अभ्यासिका पूर्णत्वास ते नेत आहेत. त्या अभ्यासिका पाहनी प्रसंगी डॉ. अरविंद कोलते, मुख्याधिकारी आशिष बोबडे, नगरसेवक राजू पाटील, ता. अध्यक्ष बंडू चौधरी, नगरसेवक अनिल जैस्वाल, नगरसेवक प्रमोद दादा अवसरमोल, नगरसेवक जाकीर मेमन उपस्थित होते.