डोमरूळ ग्रामपंचायत च्या वतीने महिला पोलीस म्हणून निवड झालेल्या पूजा इंगळे यांचा नागरी सत्कार

चांडोळ:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- धाड येथुन जवळच असलेल्या डोमरूळ ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने पूजा मनोहर इंगळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला पूजा इंगळे यांनी मागील महिन्यामध्ये झालेल्या छत्रपती संभाजी नगर येथे महिला शहर पोलीस भरती मध्ये यश संपादन करून गावाच्या इतिहासातील पहिल्या महिला पोलीस म्हणून मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशाबद्दल डोमरूळ गावच्या सरपंच सौ मधुरी विशाल धंदर यांनी शाल श्रीफळ फुष्प देऊन सत्कार ग्रामपंचायत आणि गावाकरी यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार केला या प्रसंगी ग्रामसेवक संजय शिंदे ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव, प्रकाश पडोळ, सौ वंदना इंगळे,सौ.येशोदा धंदर,सौ गीता धंदर, शाळा समिती अध्यक्ष गणेश पडोळ,उपाध्यक्ष समाधान इंगळे,मोहन धंदर,धनसिंग पाडळे ,प्राथमिक शाळे चे मुख्याध्यापक शिक्षक आणी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संभाजीनगर येथील भरतीत नियुक्ति झालेल्या पुजा इंगळेने छत्रपती संभाजीनगर येथील भारत करिअर अकॅडमी मध्ये भरतीपूर्व प्रक्षिशण घेतले आहे.