भर पावसात काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री ताई शेळके यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केला मूक निषेध
लाडक्या बहिणीच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावित :- ॲड.जयश्री शेळके

बुलढाणा – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- कलकत्ता, मुजफ्फरपुर, बदलापूर आणि अकोला येथील घटनांनी आपण सर्व हादरुन गेलेलो असतांनाच आता मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील वर्दडी बु. येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने विद्यार्थीनींसोबत गैरकृत्य केल्याची दुर्देवी तसेच माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या सर्व घटना अत्यंत भयंकर असून यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. अशा घटनांविरोधात प्रशासनाने ठोस निर्णय घेवून अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात महिला, तरुणी तसेच अल्पवयीन मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी अर्ध्याहून अधिक गुन्ह्यांची भितीपोटी, बदनामीपोटी नोंद होत नाही. महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यात महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. देशभरात अत्याचाराच्या घटना होत असल्या तरी स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारा महाराष्ट्र याबाबतीत अग्रेसर असणे ही अत्यंत लाजीरवाणी व खेदाची बाब आहे.
३-४ वर्षांच्या मुलींसोबत शाळेत जर गैरवर्तन केल्या जात असेल तर मुलींच्या पालकांनी मुलींना शाळेत पाठवावे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातही शाळकरी लहान मुलींसोबत होणाऱ्या लैंगीक अत्याचाराच्या घटना थांबविण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका व खाजगी शाळांमध्ये सी.सी.टीव्ही बसविण्यात यावेत.
चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक हा प्रत्येक शाळेत दर्शनी भागात लावण्यात यावा. मुलांना, पालकांना त्याबाबत जागृत करावे. शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र व रेकॉर्ड हे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तपासले जावे. शाळकरी मुलांना ने-आण करणाऱ्या वाहनधारकांचे व चालक-वाहक यांचेही रेकॉर्ड संबंधित पोलीस स्टेशनकडे असावे. अशाप्रकारच्या घटना रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने एक पथक नेमून शाळांना भेटी द्याव्यात.
कलकत्ता, मुजफ्फरपुर, बदलापूर, अकोला आणि किनगावराजा येथील अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करुन भविष्यात अशा स्वरुपाच्या घटना घडणार नाहीत यासाठी सकारात्मक आणि कठोर पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. बुलडाणा जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड.जयश्री शेळके यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नंदिनी टारपे, संगीता पंजाबी, अर्चना शेळके, रत्ना शेळके, अनिता गायकवाड, कविता पवार, पुजा शेळके, रूपाली उबरहंडे, जयश्री राऊत, स्वाती जाधव, रूपाली इंगळे, रूपाली मोरे, तेजल टेकाळे, किर्ती परिहार, संगीता देशमूख, सोनाली वाघ, उषा वाघ, सुलभा देशमूख, स्मीता वराडे, आशा वराडे, पुजा शिंगणे, रेखा जाधव, सपना शिंदे, मंजूळा सोळंके, कमल जाधव, अश्विनी जाधव, उषा चिंचोळकर, रत्ना वराडे, आम्रपाली कंकाळ, वंदना जवंजाळे, अश्विनी फदाट, प्रणाली पडघान, उषा साळोख, कविता भागीले, अर्चना निर्मळ, सरीता सिरसाट, नंदा चौधरी, सविता काळे, वनिता खरात, शोभा जाधव, सुनंदा गायकवाड, मणकर्णा लोखंडे, निर्मला खरात, मिना खरात, शालीनी चव्हाण, कमल वानखेडे, शुभांगी मगर, सोना धुरंधर, सुंदरबाई हेरोळे, सुरेखा सुरोशे, उषा अंभोरे, आशा सपकाळ, शालू नरवाडे, लक्ष्मी जाधव, सविता मोरे, समिना अंजूम सय्यद इरफान, तरवीर अंजूम सय्यद आसिफ, लता मोरे, लता जाधव यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.