बुलढाण्यात महाविकास आघाडीने व्यक्त केला “मुकसंताप”…
राज्यकर्ते असंवेदनशील ; फडणवीसांसह राज्य सरकारनेच राजीनामा द्यावा - जालिंदर बुधवत

बुलढाणा-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- बदलापूर, कलकत्ता, अकोला तसेच महाराष्ट्रात महिलावर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटने विरोधात महाविकास आघाडीतर्फे आज बुलढाणा येथील संगम चौक स्थित असलेल्या छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुकसंताप आंदोलन करण्यात आले. काळे झेंडे, काळे रुमाल बांधुन महाविकास आघाडीने संगम चौकात लैंगिक अत्याचाराच्या विरोधात सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, काँग्रेस चे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजय राठोड, उपाध्यक्ष विजय अंभोरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नरेश शेळके, बी टी जाधव, पी एम जाधव , संतोष आंबेकर, संदिप शेळके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
देशात राज्याच्या एकूण नावलौकिकाला अशा घटनांमुळे धक्का लागतो आहे. राज्य सरकार असंवेदनशील आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारने देखील राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. बदलापूर , कलकत्ता अकोला तसेच महाराष्ट्रात महिलावर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे आज दिनांक २४/८/२०२४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक पुकारलेली होती, परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या सन्मान राखत महाविकास आघाडीने काळे झेंडे, काळे रुमाल बांधून मुक निषेध आंदोलन करण्यासंदर्भात पदाधिकारी यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज संगम चौक बुलढाणा येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे, काळे रुमाल बांधून निषेध आंदोलन करत सरकारचा निषेध केला व बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी मागणी केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडेकर, डॉ मधुसुधन सावळे, अशोक गव्हाणे कॉंग्रेसचे तालुका प्रमुख सुनील तायडे, शहराध्यक्ष दत्ता काकास, सुनील सपकाळ , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष भगवान शेळके, तालुका प्रमुख तुळशीराम काळे यांचेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे – सचिन परांडे, संजय दर्डा, माणिकराव खांडवे, डॉ अरुण पोफळे, ओमप्रकाश नाटेकर, आशिष खरात, एकनाथ कोरडे, मोहम्मद सोफियान, अनिकेत गवळी, संजय शिंदे, बबन खरे, पृथ्वीराज राजपूत ,कॉंग्रेस पक्षाचे – नंदू शिंदे, डॉ पुरुषोत्तम देवकर, अर्चनाताई चव्हाण, सतीश मेहेंद्रे, अशोक जैस्वाल, शैलेश खेडकर, बाळाभाऊ भाकरे , विजय कड, व्ही आर चव्हाण, जीवन जाधव, डी एन सपकाळ, दिलीप राजपूत, अभय सोनुने, कांता चव्हाण, विनोद गवई , संदिप बिलारी, शेख मुज्जू, बाबा उमर, एकनाथ चव्हाण, सय्यद आसिफ , नितीन राठोड, विजय मोरे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे – गणेश कोरडे, गणपतराव, कुसळकर, रामराव नाईक, पंजाबराव राऊत, ऋषिकेश राजपूत, सय्यद इकबाल, मनोज चंदन, विनोद गवई, संदिप बोर्डे, शंकर महाराज येळगावकर यांचेसह महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.