बाप्पा किन्होळा मध्ये 18 फूट लांबीचा अजगर.
सर्पमित्र देवा खरात यांनी केला आजगर रेस्क्यू.

चिखली – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- किन्होळा येथील शेतकरी श्री.गणपत बाबा बाहेकर यांच्या शेतात अजगर जातीचा अठरा फूट लांबीचा व 33 किलो वजनाचा अजगर साप आढळला. सदर शेतकरी भवानिदास शेतामध्ये फेरी मारत असताना त्यांना अजगर जातीचा साप आढळला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर भवानीदास बाहेकर यांनी. किन्होळा येथील सर्पमित्र देवा खरात यांना साप रेस्क्यू करण्याची सूचना दिली. सर्पमित्र देवा खरात यांनी 18 फूट लांबीचा व 33 किलो वजनाचा अजगर साप सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आला. रेस्क्यू केलेला अजगर साप हा बुलढाणा येथील वनविभाग. राणी बाग मध्ये सोडण्यात आला.
यावेळी. गावातील नागरिक शेतकऱ्यांनी साप पाहण्यास गर्दी केली. या वेळी किन्होळा येथील, सर्पमित्र देवा खरात. प्रभू काका बाहेकर, दिनकर नाना ,राजूभाऊ खरात, शेख अन्सार भाई ,अभिजीत राजपूत ,अमोल बाहेकर छगन सरदार अहमद भाई सिद्धार्थ वानखेडे,नितीन धंदर यांच्या सर्व उपस्थितीत मध्ये हा विषारी अजगर साप पकडण्यात आला.
यावेळी सर्प मित्र देवा खरात यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, साप हा शत्रू नसून शेतकऱ्यांचा मित्र आहे तरी कोणाला साप आढळल्यास माहिती द्यावी असे नागरिकांना देवा खरात यांनी संबोधित केले.