Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

जनता विद्यालयात सायबर क्राईम रस्ते सुरक्षा व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम संपन्न 

Spread the love

 

बुलढाणा आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- दि.27 ऑगस्ट 2024 रोजी पिपळगाव सराई येथील देशोन्नती चे प्रतिनिधी व पत्रकार मा,सुनिल खडांरे यांना भारतातील समाजिक समानता सात वी आंतर राष्ट्रीय परिषद राजधानी दिल्ली येथील ग्लोबल हुमन राईट् या संस्थेने पुरस्कार दिल्या बद्दल व जनता विद्यालय मध्ये आज सायबर क्राईम व रस्ते सुरक्षा तसेच शिष्यवृत्ती वाटप य कार्यक्रम संपन्न झाला.बायोस्टेट इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे जनता विद्यालयातील एकूण दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपये याप्रमाणे एकूण पंचवीस हजार मदत सदर कंपनीतर्फे करण्यात आली. त्याचप्रमाणे सायबर क्राईम वर रस्ते सुरक्षा हा कार्यक्रम रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत राबविण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोद ठोंबरे हे होते. प्रमुख मार्गदर्शक रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री दुर्गेशजी राजपूत हे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये विद्यालयाचे स्थानिक सल्लागार श्री मदनराव गवते, साहेबराव गवते, सदाशिव शिंदे, भावसिंग सोळंके, बायस्टेट इंडिया लिमिटेड कंपनीचे मॅनेजर सतीश देशमुख , इंगळे सर , धंदर सर, शुभम शेवाळे, अजय पाटील शेवाळे, रामेश्वर पाटील गवते, सत्कारमूर्ती शंकरराव तरमळे तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कांताताई तरमळे, सुनिल खंडारे पत्रकार, विठ्ठल सोनुने पत्रकार, शाम झगरे पत्रकार, गणेश अंभोरे पत्रकार व गणेश मोरे पत्रकार, बाजार समिती संचालक श्री सुनील गवते इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते, बायोस्टेट इंडिया लिमिटेड कंपनी तर्फे विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी अडीच हजार प्रमाणे पंचवीस हजाराची मदत करण्यात आली, त्यांना त्याची प्रमाणपत्र व त्यांचे स्वागत करण्यात आले, या विद्यार्थ्यांमध्ये वर्ग दहा चे दहा विद्यार्थी लाभार्थी म्हणून होते, कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर सतीश देशमुख साहेब यांनी कंपनीचा हेतू व उपक्रम सांगितले.

सुनिल खंडारे पत्रकार यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे विदेश दौरा आटपून आलेले शंकर तरमळे दाम्पत्य यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.त्यांच्या कार्याविषयीं थोडक्यात माहिती जैष्ठ शिक्षक श्री पाटोळे सर यांनी दिली.महिला व बाल कल्याण अधिकारी श्री सपकाळ सर जिल्हा परिषद बुलढाणा हे सुद्धा कार्यक्रम साठी आवर्जून उपस्थित होते. बाल हक्क व बाल कायदा याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.मान्यवरांच्या हस्ते इको क्लब मार्फत सौं. प्रतिभा ठोंबरे यांनी दिलेल्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

रायपूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री दुर्गेश राजपूत साहेब यांनी रस्ते सुरक्षा व सायबर क्राईम, बाल सुरक्षा यावर प्रामुख्याने प्रकाश टाकला, अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन तथासूत्रसंचालन देविदास दळवी यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. सुधाकर सस्ते यांनी केले.फलक लेखन श्री असोलकर सर व खानंदे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिप्रमं चे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला, प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक आरसोडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page