Homeबुलढाणा (घाटावर)
कु. अन्वी घवघवीत यश..!
मेजर ध्यानचंद सेंट्रल स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ इंडियाने स्केटिंगमधील कामगिरीबद्दल सुवर्णलक्षा क्रीडा पुरस्कार...!

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- येथील कु. अन्वी तुषार हिंगे,सध्याचे निवासस्थान बावधन, पुणे हीने प्रशिक्षक प्रशांत पारसवार यांच्या नेतृत्वाखाली, मेजर ध्यानचंद सेंट्रल स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ इंडियाने स्केटिंगमधील कामगिरीबद्दल सुवर्णलक्षा क्रीडा पुरस्कार 2024 (VIP Person) देऊन सन्मानित केले आहे. अन्वी दोन सुवर्ण पदकांसह राष्ट्रीय चॅम्पियन आहे. आता ती इंडोनेशिया येथे 24-27 ऑक्टोबर 2024 दरम्यान होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताच्या U14 चे प्रतिनिधित्व करणार आहे. कर्नाटकातील बेळगावी येथे 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.