मुलींनो सावधगिरी व आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्याच!
वैशाली तायडे यांनी गिरविला सजगतेचा पाठ !

हिवरा आश्रम – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय व विवेकानंद ज्ञानपीठच्या मुलींसाठी समुपदेशन व सुरक्षेसाठी संवाद आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसापासून लैंगिक शोषणाच्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सर्वांसमोरच एक मोठे आव्हान आहे.त्यामुळे मुलींनी घाबरून न जाता आपापल्या जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेला हेल्पलाइन नंबर नेहमी लक्षात ठेवावा तसेच प्रत्येक ठिकाणी वाईट अनुभव येईलच असे नाही जगातील सगळेच पुरुष वाईट नसतात मात्र आपल्या सुरक्षेसाठी सावधगिरी म्हणून मुलींनी नेहमी सजग राहावे आणि वेळोवेळी आपल्या पालकांशी संवाद साधत राहिले पाहिजे.असे वैशाली तायडे यांनी मुलींशी संवाद साधून पाठ गिरविला.
याप्रसंगी विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी.पवार, विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे, पर्यवेक्षक संजय भारती सर,प्रा.डॉ. ज्ञानेश्वर गाडे,वर्षाताई थोरहाते,सौ.बुधवानी मॅडम आणि मोठ्या प्रमाणावर विद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आपल्या विद्यालयाच्या परिसरात मुलींना नेहमीच सुरक्षित वाटते. मात्र बाहेर पडल्यानंतर आपली सुरक्षा आपण कशी करावी यासाठी संवाद आवश्यक असल्याचे विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे सर यांनी म्हटले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य आर.डी.पवार सर यांनी भूषविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रा.डॉ.ज्ञानेश्वर गाडे यांनी तर विद्यार्थिनींनी आभार मानले.
आयुष्यात अनेक घटना व प्रसंग अचानक येत असतात त्यासाठी आपण तयार असतोच असे नाही. मात्र आलेल्या संकटाशी लढण्याची तयारी मात्र नेहमी ठेवली पाहिजे. आपले आई,वडील व शिक्षक नेहमीच आपले भले इच्छितात.त्यामुळे आपल्या व त्यांच्या अपेक्षांचा मेळ साधत आपले उज्वल भविष्य घडविणे आपल्या हातात आहे.परंतु गत काही दिवसापासून घडलेल्या अत्याचाराच्या घटना घडामोडी आपल्या मनात भय निर्माण करत असल्या तरी स्वरक्षणासाठी आपण नेहमी तत्पर राहावे असे प्रतिपादन यावेळी वैशाली तायडे यांनी केले.