Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटाखाली)
धक्कादायक दुर्दैवी घटना बैल धुण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-करण झनके:-पोळ्याच्या दिवशी बैल सजवले जातात तत्पूर्वी त्यांना धुण्यासाठी नदीवर घेऊन गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. देवधाबा येथील प्रवीण काशीराम शिवदे वय ३२ वर्ष तर हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर वय २७ वर्ष अशी मृतकांची नावे आहेत. ही घटना कळताच मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी तातडीने प्रशासनाला अलर्ट केले. त्याचप्रमाणे रेस्क्यू टीम घेऊन घटनास्थळी पोहोचले. दोन्ही शेतकऱ्यांच्या मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून या दुर्दैवी घटनेबद्दल आमदार राजेश एकडे यांनी शोक संवेदना व्यक्त करीत मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वंन करीत धीर दिला.