दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा पोळा सण मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- करण झनके:- दि. 2 सप्टेंबर धरणगाव या गावात बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या आदेशांचे पालन करून घरोघरी बैलपोळा साजरा करण्यात आले, धरणगाव या गावामध्ये सर्व गावकऱ्यांनी केला पोळा सण साजरा, आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर)आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजवत एकत्र आणल्या जातात.त्यानंतर, ‘मानवाईक’ (ज्याला गावात मान आहे तो तोरण तोडतो व पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास ‘बोजारा’ (पैसे) देण्यात येतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. म्हणून आज रोजी धरणगाव या गावात केला पोळा सण साजरा, यावेळी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.