शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे. तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळ्यात सजू दे….
आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते बळीराजा स्मारकाचे पूजन करून शहरात पोळा मोठ्या उत्साहात साजरा
बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सांगता बैल पोळा व पिठोरी अमावस्येने होते. शेतकर्यांचा सर्जा राजा अर्थात बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करून बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो.आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी पूर्वीची अवजारे आणि बैलांचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्यासोबत वर्षभर शेतात राबणार्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा बुलढाणा शहरात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बुलढाणा येथील जुना गाव वेशी मध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बैलपोळा आयोजित करण्यात आला होता.
आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बळीराजा स्मारकाचे पूजन करून मोठया उत्साहात बैलपोळा सण संपन्न झाला.बुलडाणा-दरवर्षी प्रमाणे यावर्षी बुलडाणा येथील जुनागाव वेशमध्ये आमदार गायकवाड यांच्या नियोजनात बैलपोळा मोठ्या उत्साहात पार पडला बैलांची संख्या नगण्य तर जनतेची संख्या असंख्य होती सुरुवातीला सर्व जेष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान आमदार संजय गायकवाड यांच्याहस्ते हनुमान मंदिर जुनागाव येथे मानाचा रुमाल,टोपी व नारळ देऊन करण्यात आला. त्यानंतर मानाची गुढी घेऊन निलेश वैद्य उमेश वाघमारे सुधीर शेळके यांनी मंदिरासमोर आणल्यानंतर ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या साक्षीने गुढी वाजत गाजत पोळ्यामध्ये आली येथे वेशीमध्ये तोरणा खाली आमदार गायकवाड यांनी मानाच्या बैलांची पूजा केली त्यानंतर तोरण तोडून पोळा फोडण्यात आला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता पोळा शांततेत पार पाडण्याकरिता महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड,धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, किसान सेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक आशिष जाधव,मल्हारी गायकवाड,युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड,सचिन गायकवाड यांच्यासह शिवसेना,युवासेनेचे पदाधिकारी तसेच नागरिकांचे सहकार्य लाभले, यावेळी त्याठिकाणी शहरातील कष्टकरी,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…