Homeबुलढाणा (घाटावर)

भैय्यासाहेब पाटील आजपासून विधानसभेच्या मैदानात….

मी जनतेचा उमेदवार जनता जनार्दन मला नक्कीच आशीर्वाद देणार

Spread the love

 

मेहकर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- विधानसभा निवडणुकांचे वारे चांगलेच वाहत आहे. श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्या माध्यमातून भैय्यासाहेब पाटील हे आजपासून मेहकर विधानसभेच्या रिंगणात उतरले आहे. 31 ऑगस्ट रोजी त्यांनी मेहकर येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. मी सध्या तरी कोणत्याही पक्षाकडून इच्छुक नाही मी जनतेचा उमेदवार आहे. जनतेच्या हितासाठी मी मेहकर विधानसभा लढवित असून जनता जनार्दन मला नक्कीच आशीर्वाद देईल असा ठाम विश्वास भैय्यासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना सांगितले आहे. भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले की, गेल्या 20 ते 25 वर्षापासून जनतेच्या संपर्कामध्ये आहे. राजकारणात नेहमी सक्रिय असून राजकारणाच्या माध्यमातून शेतकरी गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार महिलावर्ग यांच्या प्रश्नासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो. मेहकर लोणार मिळून असलेल्या मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात कोणताच पाहिजे तसा विकास झाला नाही. समस्या जैसे थे तसेच कायम आहे. मेहकर चे बस स्थानकाचे भिजत घोंगडे गेल्या चार ते पाच वर्षापासून जसेच्या तसे आहे. एवढे वर्ष बस स्थानक तयार करण्यासाठी लागत आहेत तर इतर विकासाच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे भैय्यासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले आहे. सध्या तरी मी कोणत्याच पक्षाकडून संपर्क किंवा प्रचार करीत नसून वेळेवर घडणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. भाजपच्या माध्यमातून माजी सुरुवात झाली असून 2022 मध्ये मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. श्री गजानन महाराज सेवा समितीच्या माध्यमातून मी सध्या काम करीत आहे. येणाऱ्या निवडणुकीत मी जनतेचा उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी सामोरे जाणार आहे जनतेच्या अडचणी समस्या सोडविण्यासाठी मी 24 तास जनतेच्या सेवेत राहील मेहकर मतदार संघाच्या विकासासाठी मी अहोरात्र शासनापर्यंत व प्रशासनापर्यंत प्रयत्न करणार असून जनतेने मला मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत आतापर्यंत जे सरकार आले त्यातील सत्ताधारी आमदारांनी कोणताच विकास मेहकर मतदार संघात केल्याचे दिसत नाही मेहकर मतदार संघात अनेक समस्या आहेत सुशिक्षित बेकारांची संख्या वाढली आहे, अनेक गावांना रस्ते नाहीत कोट्यावधी रुपयाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत मात्र या योजना अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाच्या व अर्धवट परिस्थितीमध्ये असल्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात जात आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आपापल्या परीने आश्वासने देत असतात मात्र मी केवळ आश्वासन न देता जनतेच्या आशा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे जनतेने मला सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी भैय्यासाहेब पाटील यांनी केले तर आज पासून त्यांनी जनतेशी संपर्क सुरू केला असून हे मेहकर मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी ते ठाम आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page