किरकोळ वादातून एकाला चाकूने भोसकून केले जखमी…!
मलकापूर परिसरातील घटना..!

मलकापूर : आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- करण झनके: येथील मंगल गेट परिसरात बांधकामांचे साहित्य ठेवण्याच्या किरकोळ वादातून एकाला चाकूने भोसकून जखमी केल्याची घटना दि, ४ सप्टेंबर रोजी मंगल गेट परिसरात घडली.
मलकापूर येथील आरोपी राजेश प्रेमचंद शर्मा (वय ५०, रा. मंगल गेट) व निलेश प्रकाश सोनोने या दोघांत सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य ठेवण्यावरून आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाद निर्माण झाला. यावेळी राजेशने निलेशला मानेवर उजव्या डाव्या बाजूला, पोटाखाली चाकूने वार करून जखमी केले. यानंतर निलेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. निलेशवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
या दरम्यान तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी राजेश प्रेमचंद शर्मा याच्याविरुद्ध अप क्र. ४३७/२०२४ कलम ११८ (२), ३५,३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र सपकाळ पुढील तपास करत आहेत.