आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी अतिवृष्टी भागांची केली पाहणी..
आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी घेत धिर दिला.

लोणार: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: (लखन जाधव):-अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेकडो हेक्टर वरील शेती पिके उध्वस्त झाली आहे. आज लोणार तालुक्यातील टिटवी,नांद्रा,रायगाव,सावरगाव मुंढे या शिवारामध्ये ढगफुटी व अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने जमिनीतील पिके अजूनही पाण्याखाली आहेत. येथील नदीकाठची दोन्हीबाजूची पेरलेली शेते खरडून गेली. शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील माती वाहून गेली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बळीराजाचे नुकसान झाले आहे. तसेच नदीसह लहान मोठे ओढे तुडुंब भरून वाहात आहेत. परिणामी, बळीराजा अतिशय चिंतेत आहे. पावसामुळे प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात सूचना केल्या.
व यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, शिवसेना तालुकाप्रमुख श्री. भगवान पाटील सुलताने, शहरप्रमुख मा.पांडुरंग सरकटे, माजी जि.प.सदस्य भगवानभाऊ कोकाटे व प्रमुख पदअधिकारी व महसूल विभागाचे श्री.रविंद्र जोगी साहेब,तहसीलदार भुषण पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री.काळे साहेब,कावरके साहेब, गटविकास अधिकारी श्री.देशमुख साहेब व ग्रामसेवक,तलाठी,मंडळ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विविध गावचे सरपंच, शेतकरी, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.