मलकापूर येथील वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी सुस्थितीत सुरू करावी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी...

मलकापूर :- आपला बुलढाणा जिल्हा बातमी: ही बाजारपेठ कापसासाठी जगप्रसिद्ध बाजारपेठ असून मलकापूर नजीकचे संपूर्ण जमिनीचे क्षेत्र कापसासाठी जगप्रसिद्ध आहे वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी ही इंग्रजांच्या काळातील संकल्पना असून गेली 25 ते 30 वर्षे झाले ही सूतगिरणी मरणावस्थेत पडलेली असून आमच्या आजोबांच्या घामाच्या रक्ताच्या थेंबातून तयार झालेली असून मलकापूर नांदूर येथील काही विशिष्ट पुढार्यांनी या सुतगिरिणी ला मातीत घालण्याचे काम केलेले आहे. तसेच या सूतगिरणीच्या भरोशावर 2000 ते 2500 कामगारांचा संसार उघड्यावर पडलेला आहे व आर्थिक जीवनाचे नुकसान झालेले आहे. ज्या पुढार्यांनी या सूतगिरणीला मातीत घालण्याचं काम केलेलं असेल त्यांना या भागातला शेतकरी जनता कधीच माफ करणार नाही. ज्यावेळेस सूतगिरणी बंद पडली त्यावेळेच्या संचालक मंडळाची एसआयटी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून सुतगिरिणी ला शासनाने योग्य तो निधी देऊन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा व सूतगिरणी पूर्ववत सुस्थितीत सुरू करून शेतकऱ्यांना व कामगारांना न्याय देण्याचे काम शासन प्रशासनाने करावे जेणेकरून या भागात जग्गू डॉन व पप्पू डॉन सारखे दलाल उदयास येणार नाहीत अन्यथा सबंध शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून राज्यभर वनवा पेटवण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येईल असे निवेदन तहसीलदार साहेबांना दिले निवेदन देतेवेळी निलेश नारखेडे सचिन शिंगोटे दादाराव भाऊ जुनारे सुरेशभाऊ मराठे प्रमोदभाऊ वनारे इतर कार्यकर्ते हजर होते