डॉ. ऋतुजा चव्हाणला वाढत आहे वयोवृद्धांचा पाठिंबा
नवीन व महिला आमदाराच हवी वयोवृद्धाने केल्या भावना व्यक्त परिवर्तन होणे गरजेचे

मेहकर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर ऋतुजा चव्हाण ह्या निवडणूक लढवणार असून त्या दृष्टीने त्यांनी खेड्यापाड्यांमध्ये आपला संपर्क वाढविला आहे संपर्क वाढवत असताना डॉक्टर ऋतुजा ताई यांनी भविष्यामध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रम गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या समस्या या संदर्भात त्या जनतेशी संवाद साधत आहे त्याचबरोबर त्यांचे सहकारी कार्यकर्ते मुली महिलावर्ग ह्या सुद्धा ऋतुजा ताईसाठी जीवाच रान करत आहेत मेहकर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाला भेटी देऊन विचार विनिमय व त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीत उभे राहावे अथवा नाही जनतेचे मत किंवा जनतेच्या अपेक्षा काय आहेत हे ऋतुजा चव्हाण यांच्याकडून व त्यांच्या सहकार्याकडून चाचपणी अथवा कानोसा घेत आहे या दरम्यान एका गावामध्ये वयोवृद्ध असलेल्या मात्र राजकारणाची संपूर्ण माहिती असलेल्या व्यक्तीने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आहे की आता काहीतरी नवीन पाहिजेत महिला आमदार आवश्यक असून महिलांना समस्यांची जाण असते महिलावर्ग समस्या सोडविण्यासाठी जिद्द चिकाटी व मेहनत करतात ग्रामीण व शहरी भागातील समस्यांची महिलांना तंतोतंत माहिती असते त्यामुळे यावेळेस मेहकर मतदारसंघात परिवर्तनाची गरज असून महिला आमदारच असायला हव्या अशा भावना त्या वयोवृद्ध माणसाने व्यक्त केल्या आहेत त्यामुळे सध्या तरी डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांना ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून डॉ. ऋतुजा ताई ह्या प्रत्येक गावात जाऊन त्या गावातील समस्या अडीअडचणी यांची विचारपूस करत आहेत यावेळी त्या वयोवृद्धाने सांगितले की ताईने आमच्या गावात येऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजेत आम्ही सुद्धा आमच्या अडीअडचणी ऋतुजा ताईंना सांगून त्यांना आमचा पाठिंबा नक्कीच देऊ जुन्याला लोक कंटाळले असून आता काहीतरी नवीन पाहिजेत अशा भावना सुद्धा वयोवृद्ध माणसाने व्यक्त केले आहेत डॉ.ऋतुजा चव्हाण यांना वाढता पाठिंबा पाहता विरोधकांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण दिसून येत आहे अजून निवडणुका अडीच ते तीन महिन्यावर आहेत तोपर्यंत ऋतुजा चव्हाण मेहकर मतदार संघातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे व त्यांना चांगला पाठिंबा सुद्धा मिळत आहे एक सर्वसामान्य कुटुंबातील व समस्यांची जाण असलेली महिला जर आमदार झाली तर मेहकर मतदार संघाचा नक्कीच विकासात्मक कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असेही बोलल्या जात आहे
ऋतुजा चव्हाण यांच्यासाठी सर्व समाजातील लोक महिलावर्ग मुली स्वतःहून पुढाकार घेत असून गोरगरीब मतदारांशी संपर्क करत आहेत ऋतुजा चव्हाण यांना यावेळेस आमदार करण्यासाठी सर्व एकजुटीने काम करत असल्याचे दिसून येत असून डॉक्टर ऋतुजा ताईंना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.