उत्सवात डिजे, लेझर लाइट मुक्त संकल्पना राबवावी :- जिल्हा पोलिस अधीक्षक पानसरे

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- करण झनके:- गणेश उत्सवात डिजे, लेझर लाईट चा वापर न करता उत्सव आंनदात साजरा करा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे परखड मत जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी व्यक्त केले. यामुळ उद्देशाला पुर्णत्वास जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत या पार्श्वभूमीवर भातृमंडळ येथील सभागृहात १० सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यावेळी मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी देवराम गवळी, पोलिस निरीक्षक गणेश गिरी, नायब तहसीलदार श्रीकांत उगले, मुख्य अधिकारी आशिष बोबडे, महावितरण अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी समतेचे निळे वादळ अशांत वानखेडे, शेतकरी संघटनेचे दामोदर शर्मा, मान्यवरांनी आपले मत नोंदवत गणेश उत्सव सह सर्व समाज बांधवांनी उत्सव साजरा करताना डिजे, लेझर लाईट, या सारख्या बाबींमुळे अनेकांना इजा होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
पोलिस आपल्या संरक्षणासाठी कार्य करत असतात ते आपले कर्तव्य बजावत असताना अश्या वेळी नागरिकांनी ही त्यांना सहकार्य केले पाहिजे तेव्हढीच जवाबदारी आपलीं आहे असे मत नोंदवत मान्यवरानी भाषणाला पुर्ण विराम देत शांतता समितीच्या बैठक पार पडली या बैठकीचा मुळ उद्देश कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनाच काळजी घेत मोठ्या उत्साहात सन उत्सव साजरा करावा. या दरम्यान उपस्थित शांतता समितीच्या बैठकीत जेष्ठ सदस्य प्रशासनाचे प्रतिनिधी, गणेश मंडळांचे पदाधिकारी पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.