मातोश्री कार्यालय बनते गरजूंसाठी ‘मदत केंद्र!’
तुकारामांच्या' उपचारासाठी दिले 50 हजार, 2 दिवसापूर्वी 'शास्त्रींना' दिले होते 1 एक लाख! -आमदार संजय गायकवाड यांचे असेही दातृत्व!

बुलढाणा: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- शिंदे गट शिवसेनाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय असतात.त्यांचा स्पष्टवक्तेपणा अनेकदा त्यांना अडचणीत देखील आणतो.पण या पलीकडे त्यांच्यातील दातृत्व अनेकांना माहिती नाही.दोन दिवसांपूर्वी त्यांनी छावा संघटनेचे जुने कार्यकर्ते विलास शास्त्री यांना उपचारासाठी एक लाख रुपयांची मदत केली तर आज राहेरा येथील तुकाराम जाधव यांच्या उपचारार्थ 50 हजारांचा मदतीचा हात दिलाय.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड राजकारणच करीत नाही तर समाजकार्यात सक्रिय असतात. त्यांच्याकडे येणाऱ्या गोरगरीब जनतेला सढळ हाताने कायमस्वरूपी मदतीचा हात ते देत असतात. आपल्या दरवाज्यात आलेला आणि अडीअडचणीत सापडलेला मग तो कोणत्याही पक्षाचा कोणत्याही धर्माचा नागरिक असो त्याला आपल्या परीने सढळ हाताने मदत करणं हे परम कर्तव्य मानतात. म्हणूनच त्यांच्या जयस्तंभ चौकातील मातोश्री कार्यालयात दिवसातून शेकडो लोक भेट घेऊन आपली अडचण सांगून आर्थिक मदतीची मागणी करतात. त्या नागरिकांची अडचण समजावून घेत त्याला आपल्या परीने तातडीची आर्थिक मदत करून अडीअडचणीतून बाहेर काढण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो.
आज 10 सप्टेंबर रोजी शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे मोताळा तालुक्यातील ग्राम राहेरा येथील तुकाराम बळीराम चव्हाण यांच्या कुटुंबीयांना आमदार गायकवाड यांच्याहस्ते उपचारासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तुकाराम बळीराम जाधव हे संभाजीनगर येथील हेडगेवार रुग्णालय येथे 29 ऑगस्ट पासून आजपर्यंत ऍडमिट आहे,त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आमदार गायकवाड यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली तसेच संपूर्ण परिस्थिती कथन केली असता, आमदारांनी लगेच त्यांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्यासह शिवसेना,युवासेनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.