मानस फाउंडेशनच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक विधवा महिलांनी केले गौरीपूजन

बुलडाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- समृद्धी आणि मांगल्यांचे प्रतीक असणारा गौराईचा सण सध्या उत्साहात साजरा केला जात आहे. ही पूजा सुहासिनी महिलांकडून करून घेण्याची प्रथा आहे. मात्र मानस फाउंडेशनने विधवा महिलांच्या हस्ते गौरी पूजा करण्याचे केलेल्या आव्हानाला बुलढाणा येथील वारे व काकडे कुटुंबीयांनी कोलवड येथील पांडे व मासरूळ येथील सिनकर कुटुंबीयांनी हा मान विधवा महिलांना देऊन एक आगळावेगळा समानतेचा संदेश देखील दिला आहे.
गणरायांच्या आगमना पाठोपाठ वेध लागतात ते गौरी गणपतीच्या उत्सवाचे. तेज, समृद्धी व मागल्यांचे प्रतिक समजल्या जाणा-या महालक्ष्मी अर्थात गौरीचा हा उत्सव बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. 10 सष्टेबरला घरोघरी गौराईचे आगमन झाले.सण उत्सव परंपरा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे परंपरेने पुढे सरकत असतात. गौराईचे पूजन हे सुहासिनीच्या हातून केले जातो. परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये मानस फाउंडेशनच्या वतीने विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या चळवळीत लोकही प्रत्यक्ष सहभागी होऊन ते अंगीकारत आहे. बुलडाणा येथील सेवा निवृत्त dysp के. वाय. वारे यांनी त्यांच्या घरी गौरीपूजन ठेवले,सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या गौरीपूजनासारखे हे गौरीपूजन न ठेवता त्यांनी सामाजिक बदलाची कास धरली.गौरी पूजनाचा आणि आरतीचा मान विधवा महिलांना दिला. काकडे कुटुंबियांनी सुद्धा विधवा महिलांच्या हस्ते गौरी पूजन केले कोलवाड येथील व मासुर येथील लिलाबाई सिनकर या विधवा महिलांनी गौरी पूजन केले विधवा महिलांनाही सन्मानाने वागवले पाहिजे, त्यांनाही दैवी कार्यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे हा संदेश या पूजनातून त्यांनी समाजापुढे उभा केला. यावेळी मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने संदीप जाधव अनिताताई कापरे उपस्थित होते. तर प्रज्ञाताई लांजेवार,मीनाक्षी खडसे,जाधव काकू यांनी आरती ,पूजन व प्रसाद वाटप केले. यावेळी पत्रकार संदीप वानखेडे ,युवराज वाघ, मनीषा वारे आदींची उपस्थिती होती.
पूजेचा मान मिळणे ही फार मोठी गोष्ट नाही. सर्वसामान्य पणे पूजाअर्चा केली जाते तशी पूजा करणे वावगे नाही.मात्र प्रथा परंपरा यांना वगळून नव्याने उभे करणे सामाजिक बदलाचे लक्षण असते. अशा सामाजिक बदलाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल विधवा भगिनी प्रज्ञाताई लांजेवार यांनी गौरी पूजनाचा मान मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.