Homeक्राईम डायरीबुलढाणा (घाटाखाली)

मलकापुर तालुक्यामध्ये चोरीचे सत्र सुरूच

Spread the love

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- अनेक दिवसापासून मलकापूर शहरांमध्ये चोरीचे सत्र सुरू आहे. मागील महिन्यामध्ये मलकापूर मधील विविध नगरांमधील टू व्हीलर फोर व्हीलर आणि घरातील रोख रक्कम चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहे. जोरांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याचे चर्चा सुरू झाली आहे. शहरामध्ये सुरक्षितेच्या विविध उपाय योजना असल्यावर सुद्धा चोरीचे प्रमाण झपाट्याने वाढल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे त्यातच आता गावामध्ये सुद्धा चोरीचा प्रमाण वाढल्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील उमाळी रोडवरील आपल्या शेतामध्ये राहणारे बाळू मुकिंदा गव्हाळे यांची टू व्हीलर क्रमांक (एम एच 28 ए.जी.6723 ) हि गाडी तर शंकर मुकिंदा गव्हाळे यांच्या घरातील (रोख रक्कम 6000 रुपये ) शेती उपयोगी मशागत करणारे अवजारे सुद्धा चोरट्यांनी लंपास करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. चोरी झालेल्या घटनेची सर्वत्र चर्चा पसरली. चोरट्यांविरुद्ध मलकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे घटनेचा अधिक तपास मलकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page