बस चालक व कंडक्टरने दुचाकीस्वाराला चोपले!
चालक व कंडक्टर विरुद्ध गुन्हा दाखल!

देऊळगाव राजा:- (आपलं बुलडाणा जिल्हा बातमी):- टाकरखेड भागिले येथे भरधाव एसटी बस ने एका दुचाकीस्वाराला कट मारल्याने उद्भवलेल्या वादात बस चालक व कंडक्टर यांनी शिवीगाळ करीत चापटा- बुक्क्यांनी दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
देऊळगाव राजा पोलीस ठाण्याला सदर प्रकरणी अरुणा दत्ता जाधव रा.टाकरखेड भागिले यांनी पोलिसात आज 10 सप्टेंबरला तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी व त्यांचा मुलगा हे देऊळगाव मही येथून एमएच 28 बीवाय 5150 क्रमांकाच्या दुचाकीने येत असताना, भरधाव वेगात असलेल्या एम एच 9 एफ एल 0471 क्रमांकाच्या बसचालकाने कट मारला.दुचाकी स्वार मुलाने बस थांबवूनचालक व कंडक्टर यांना विचारणा केली असता त्यांनी वाद घातला.दरम्यान फिर्यादी व फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करून चाप्टा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असे तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणी पोलिसांनी कलम 281,352, 351,(2) 351 (3) बिएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.