चिखली येथील शिवभोजन कार्यालयात वेगळाच प्रताप…
माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांचा फोटो झाला पलटी.

चिखली :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- महाराष्ट्र शासनाचा सुरू असलेला उपक्रम म्हणजे शिवभोजन थाली गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. चिखली तालुक्यामध्ये शिवभोजन थाळी योजना कार्यक्रम सुरू आहे. तालुक्यातील शिवभोजन कार्यालय मध्ये बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व बुलढाणा जिल्हाचे माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे फोटो काही दिवसापूर्वी लावलेले होते चिखली येथील कॉन्ट्रॅक्ट हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शैलेश अंभोरे यांना कोरोना काळापासून मिळाला आहे ते कोरोना काळापासून तेथील शिवभोजन थाळी योजनेचे पूर्ण काम पाहत आहे परंतु त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा फोटो वर आहे आणि आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांचा फोटो हा उलटा करून कार्यालयामध्ये ठेवण्यात आला आहे ही बाब काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सदर कार्यालयामधील फोटोचे व्हिडिओ चित्रीकरण करून प्रसारमाध्यमांना दिले आहे. तरी सिंदखेडराजाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांचा फोटो उलटा ठेवण्याच्या मागचे कारण काय ?अशी सुद्धा चर्चा परिसरामध्ये सुरू आहे.