Homeबुलढाणा (घाटावर)

जालिंदर बुधवतांच्या नेतृत्वातील मशाल यात्रेत हर्षवर्धन सपकाळ यांचाही सहभाग

महिलांच्या सुरक्षितेतही शिंदे -फडणवीस सरकार अपयशी - जालिंदर बुधवत

Spread the love

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-हीट अँड रन प्रकरणांमध्ये “आपल्यांना” पाठीशी घालताना कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे राज्य सरकार महिलांच्या सुरक्षितेतही अपयशी ठरले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात आठ महिन्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही गंभीर आहे. कायद्याचे राज्य आहे की “काय – द्यायचे” हाच प्रश्न ?सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. यामुळे आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर २३ सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावं अस आवाहन या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.

महत्वाचे म्हणजे आज डोंगरखंडाळा, वरवंड, पिंपरखेड, भादोला, वाडी, माळविहीर, सावळा, सुंदरखेड, अजिसपुर, नांद्रा कोळी, सागवन, कोलवड, अंभोडा, झरी, हतेडी खु, हतेडी बु, तांदूळवाडी, उमाळा, देऊळघाट या गावांमध्ये आक्रोश मोर्चासाठी मशाल यात्रा जागर करत आहे. सुवासिनी ओवाळून या यात्रेचे स्वागत करत आहेत. गाव खेड्यातील अबाल वृद्ध मशाल यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. असे असताना राज्यकर्ते मात्र वेगळ्याच बाबींमध्ये मश्गूल आहेत. काँग्रेसचे नेते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील आज जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात काढण्यात येत असलेल्या मशाल यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला. सामान्य शिवसैनिक कार्यकर्त ते आज जिल्हाप्रमुख म्हणून काम करत असलेले बुधवत हे लोकशाहीला अभिप्रेत आणि विकासात्मक काम यावर जोर असलेलं दूरदृष्टीचे नेतृत्व आहे. आक्रोश मोर्चामध्ये शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांनी व माय माऊली यांनी देखील सहभागी व्हावा असे आवाहन या निमित्ताने माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील केले. यावेळी जालिंदर बुधवत म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्यात ८ महिन्यांत बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. देशात आणि राज्यात आयाबहिणींची अब्रु सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न आता प्रत्येकाला पडतो आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे म्हणता मग हे काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात न्यायाचे, कायद्याचे राज्य होते मात्र सध्या राज्यात “काय द्यायचे” आणि “किती घ्यायचे” एवढेच चालू आहे. पोलीस यंत्रणेवर देखील प्रचंड दबाव आहे, त्यामुळे महिला सुरक्षेचे प्रचंड धिंडवडे निघाले आहेत…सरकारला लाज वाटली पाहिजे! मायमाऊल्यांची सुरक्षा जमत नसेल तर खुर्च्या खाली करा असेही यावेळी जालिंदर बुधवत म्हणाले.

यावेळी संदिप शेळके, तालुका प्रमुख लखन गाडेकर, युवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, कि से उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, कि से ता प्र अशोक गव्हाणे, बाजार समिती संचालक संजय दर्डा, राजु मुळे, हरिदास सिनकर, युवासेना ता प्र संजय शिंदे, उप ता प्र विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, सुनील गवते, संजय गवळी, गणेश पालकर, एकनाथ कोरडे, बबन खरे, शाम खडके, मोहम्मद सोफियान, राहुल जाधव, मोहन निमरोट, राजु राजगुरे, पांडुरंग काळे, शेषराव सावळे, समाधान बुधवत, रवी गोरे, सुधाकर आघाव, दिलीप सिनकर, संभाजी देशमुख, अनिकेत गवळी, मधुकर महाले, दिपक पिंपळे, श्रावण बोरकर, रामु राजपूत, अनिल राणा, रामेश्वर बुधवत, बाळासाहेब सिनकर, अवि शिंदे, कृष्णा नरोटे, भगवान आगळे, वामन पा नरोटे, भगवान नरोटे, दिलीप राजपूत, सुनील दळवी, दादाराव भिंगारे, विजय गायकी, रवी पवार, अनिकेत गवळी, योगेश गायकवाड, सुरेश गायकवाड, अजय गायकवाड, रवी राजपूत, साहेबराव इतवारे, वसंता सुरडकर, सुनील गुंडकर, अमोल जुमडे, दगडू शेळके, विजय डुकरे, गोपाल जाधव, दत्ता पवार, संतोष राजपूत, विष्णू राजपूत, रामभाऊ पवार, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page