आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेशित विद्यार्थीसाठी आनंदाची बातमी…
डिमांड ड्राफ्ट ऐवजी चेकने स्वीकारल्या जाणार प्रवेश शुल्क ....केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली होती सुचना

बुलढाणा ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी ):-आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेदरम्यान सार्वजनिक सुट्ट्या असल्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डिमांड ड्राफ्ट ( DD ) ऐवजी चेकने (धनादेशाने ) शुल्क स्वीकारल्या जावे अशी सूचना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केल्या होत्या . त्यानंतर सीईटी विभागाने या संदर्भाचे पत्रकच निर्गमित केले आहे . आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या सन 2024 25 सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी सादर करावयाच्या शुल्कची रक्कम ही डिमांड ड्राफ्टद्वारे स्वीकारल्या जाते शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्टी मुळे बँकिंग व्यवहार हे बंद राहत असल्याने एम बी बी एस प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वेळेत डिमांड ड्रॉप काढणे ही मोठी अडचण निर्माण झाली होती केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एमबीबीएस प्रवेशीत विद्यार्थीची ही अडचण लक्षात घेवुन आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया संदर्भातील शुल्क डिमांड ड्राफ्ट ऐवजी चेक द्वारे स्वीकारण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्यात . सी ई टी विभागाने यासंदर्भातील सुचना पत्रकच निर्गमित केले आहे त्यामुळे आता ( एम बी बी एस ) विज्ञान अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना आता डिमांड ड्राफ्ट (डि डि )ऐवजी चेक ( धनादेशाद्वारे )प्रवेश प्रक्रिया शुल्क भरता येणार आहे.