मध्यरात्री इनोव्हा कार मध्ये गाईंची चोरी…
चोरटे प्रसार. इनोवा वाहनाची स्थानिकांनी केली तोडफोड

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-करण झनके:-गत सहा ते सात महिन्यांपासून जनावरे चोरींचे प्रकार मलकापूर परिसरात सुरू असताना शहरातील श्रीराम नगर परिसरात काल दि. 13 सप्टेंबर च्या मध्यरात्री २ च्या सुमारास जनावरे चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांचे ठोळके दाखल झाले तेव्हा परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांचे चार चाकी वाहन तेथेच सोडून पळ काढल्याची घटना घडली. घटनेचे वृत्त पसरताच एकच खळबळ उडाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मलकापूर शहरासह तालुक्यात गेली ६ ते ७ महिन्यांपासून जनावरे चोरींचे प्रकार होत आहे. त्या संदर्भात अनेक वेळा पोलीस स्टेशनला तक्रारी दिलेले असताना सुद्धा चोरट्यांनी दि. १३ सप्टेंबर च्या मध्यरात्री २.३० च्या सुमारास श्रीराम नगर परिसरात दाखल होऊन तक्रारदार रघुनाथ नारायण बोरले यांच्या घराजवळ असणाऱ्या गाईंना वाहन क्र. एम.एच.15 डीएस. 9932 या इनोव्हा वाहनांमध्ये निर्दयी पणे भरण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अत्यंत क्रूरपणे चार गाईंना वाहनात डांबून दोरीच्या साह्याने बांधलेले होते ही बाब तक्रारदाराच्या निदर्शनास येताच त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करीत आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना सतर्क केले. नागरिकांनी एकत्रितरित्या त्या चोरट्यांच्या वाहनांच्या दिशेने जमाव केला असता चोरट्यांचे चार चाकी वाहन चिखलात अडकले. त्यामुळे त्यांनी वाहन घटनास्थळीच सोडून पोबारा केला. त्या वाहनांमध्ये चार गाईंना त्यांच्या तोंडाला व पायांना निर्दयीपणे बांधून भरलेले होते. त्याचबरोबर विशिष्ट गुंगीचे औषध सुद्धा वाहनांमध्ये आढळून आले. चोरीच्या घटनेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी चोरट्यांच्या त्या वाहनाची तोडफोड करून एक प्रकारे राग व्यक्त केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या वाहनांमध्ये डांबून ठेवलेल्या चार गाईंचे प्राण वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे. त्या संदर्भात मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. व अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड अधिनियम तथा प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम नुसार विविध कलमन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुसळे करीत आहे.