Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)
बुलढाण्यात लोकशाही नसून हुकूमशाही आणि ठोकशाही अस्तित्वात आहे – ॲड. जयश्री शेळके
जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान प्रास्ताविकेचे वाचन...

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी : राज्य आणि देशातील आताची परिस्थिती पाहता लोकशाही नामशेष करण्यासाठीचे प्रयत्न होत असल्याच पाहायला मिळत आहे, त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा मतदार संघात देखील लोकशाही नसून हुकूमशाही आणि ठोकशाही अस्तित्वात असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केला आहे..
15 सप्टेंबर हा जागतिक लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो, याच दिनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी बुलढाण्यात संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.. यावेळी बुलढाण्यातील सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.