सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल चे माजी विद्यार्थी रोहित प्रभाकर नेवले यांनी आपल्या वडिलांच्या वर्षेश्राद्ध निमित्त गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना 50 स्कूल बॅग वाटप

लोणार: आपलं बुलढाणा जिल्हा बातमी (लखन जाधव):-सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल चे माझी विद्यार्थी रोहित प्रभाकर नेवरे रा.लोणार यांनी आपल्या वडिलांच्या वर्षेश्राद्ध निमित्त आपल्या पिढीतील तरुणांना एक आदर्श निर्माण करून शाळेतील गरीब आणि गरजू होतकरू 50 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी व शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवून,शाळेची गोडी निर्माण व्हावी या उदात्त हेतूने, आई वडीलांचे छत्र हरवलेल्या, आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात रहावे जेणेकरून जेव्हा रोहितचे वडील कोरोना काळात त्याला सोडून गेल्यावर त्याने जे अनुभवले. म्हणून इतरांना अशी आर्थिक झळ बसू नये म्हणून फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण काम करायचे या उद्देशाने त्याने सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप केले.
त्याच्या या कार्याची दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक श्री. रामेश्वर डोळे यांनी रोहित नेवरे यांचा शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री.प्रवीण गुलाबराव इंगळे यांनी सूत्र संचालन केले तर प्रमुख उपस्थितीत पर्यवेक्षक श्री.नंदकिशोर सांगळे ,जेष्ठ शिक्षक गजानन वाघ तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.