बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नसून गुंडशाही :- काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके
आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ छाटून आणून देणाऱ्याला 11 लाखाचे बक्षीस देवू असे खळबळ जनक विधान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.
त्यांच्या या केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहे. बुलढाणा येथील काँग्रेसच्या प्रदेश सचिव अॅड जयश्रीताई शेळके यांनी आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा प्रकार असल्याचे म्हणत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नसून गुंडशाही असल्याचे दाखवून दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी केली आहे.
काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत संविधान धोक्यात आहे आरक्षण संपविण्याचा घाट घातल्या जात असल्याचे विधान केले जात असल्याने आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधीवर साधन साधत राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला 11 लाखाचे बक्षीस जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ जनक उडाली आहे दरम्यान याचे देशभरातून पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे गायकवाड यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी आपली सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली त्या म्हणाल्या की, चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार असून भाजपा व त्याचे सहकारी पक्ष आरक्षण लोकशाही संविधान संदर्भात वारंवार चुकीचे विधान करीत असून या विरोधातच राहिले आहे. लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून आय एस अधिकाराच्या भाजप आणि नेमणूका केल्या हे देशात सर्वश्रुत आहे त्याबरोबरच आमदार गायकवाड यांची दलित बांधवांच्या संदर्भातील आतापर्यंत काय वक्तव्य राहिले आहे? हे देखील सर्वश्रुत आहे. मुळात राहुल गांधी अमेरिकेत ज्या पद्धतीने बोलले त्या वक्तव्याचा विप्रयास केला जात आहे राहुल गांधी देशातील मागास दलित आदिवासी ओबीसी समाज बांधवांना समान न्याय व अधिकार जोपर्यंत मिळत नाही आणि आर्थिक दृष्ट्या समानता जोपर्यंत त्यांना मिळत नाही तोपर्यंत देशात आरक्षण सुरू राहील असे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांची भूमिका आरक्षणाच्या बाजूनेच राहिली आहे जातीय जनगणनेची त्यांनी वारंवार मागणी केली आहे. काँग्रेसने यापूर्वी जाहीर केले आहे की सत्तेत आल्यावर जातीय जनगणना केली जाईल जातीच्या व लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण लागू केलं जाईल आरक्षण वाढविला जाईल अशी भूमिका काँग्रेसकडून वारंवार जाहीर करण्यात आली आहे दरम्यान पुढे त्या म्हणाल्या की, ज्यांची बुद्धीची पातळी जशी आहे तसे त्याला कळते आमदार संजय गायकवाड यांचे चितावणीखोर वक्तव्य नवीन नाही ते असे वक्तव्य करण्यात माहीर आहेत त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकशाही नसून गुंडशाही असल्याचे त्यांनी स्वतःच अशी विधाने करून दाखवून दिले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी जयश्रीताई शेळके यांनी केली आहे.