प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.
चिखली मुस्लीम फाउंडेशन व सैलानी मुस्लीम फाउंडेशन कडून डीजे, ढोल ताशा वर निरर्थक खर्च न करता रक्तदानाचें स्तुत्य उपक्रम प्रशंसनीय.

चिखली :- आपलं बुलढणा जिल्हा बातमी :- मुस्लिम धर्माचे शेवटचे पैगंबर (प्रेषित) मोहम्मद स. अ. यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर गेल्या तीन वर्षापासून चिखली शहरात रक्तदानाचे स्तुत्य उपक्रम राबविल्या जात आहे.
या वर्षी चिखली शहरातील मुस्लीम बांधवांनी व सुप्रसिद्ध सैलानी या गावात राहणाऱ्या मुस्लीम बांधवांनी डिजे व ईतर ध्वनिप्रदूषण करणारे निरर्थक खर्च टाळून रक्तदानाचे समाजोपयोगी उपक्रम राबविले.
या रक्तदान शिबिरास शहरातीलच नव्हे तर सातगाव भुसारी, उदयनगर, अमडापुर सवणा व ईतर ग्रामीण भागातील तरुणांनी हिरीरीने भाग घेतला.मागील दोन वर्षातील रक्तदात्यांचा समर्पक प्रतिसाद पाहता तारांबळ उडू नये व रक्तदानाचे कार्यक्रम योग्य रीतीने पार पडावे म्हणून श्री संत सावता माळी भवन चींचपरिसर , नगर परिषद परीसर, व सैलानी नगर अश्या तीन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सुप्रसिद्ध सैलानी बाबा दर्गा (पिंपळगाव सराई) येथे पण सैलानी मुस्लीम फाउंडेशनच्या वतीने याच पद्धतीने उपक्रम राबविण्यात आला.उल्लेखनीय बाब म्हणजे सैलानी व चिखली येथिल रक्तदान शिबिरात महिला व हिन्दू बांधवांनी पण रक्तदान केल्याने सर्वधर्मीय एकतेचे दर्शन घडून आले. ऋरक्तदान शिबिरासाठी छञपती संभाजी नगर (लोकमान्य) जालना (स्वामी समर्थ) बुलढाणा (जीवनधारा) व अकोला (लेडी हार्डी) येथील रक्तपेढींना पाचारण करण्यात आले होते रक्तपेढी कडून मिळालेल्या माहितीनुसार चिखली येथील तिन्ही शिबिरात 538 तर सैलानी येथे 113 असे एकुण 651 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्त संकलनाचा मानव हाच एक स्रोत असुन मानवच मानवाच्या कामी येऊ शकतो वेळप्रसंगी आवश्यकता पडल्यास चिखली मुस्लीम फाउंडेशन व सैलानी (पिंपळगाव सराई) मुस्लीम फाउंडेशनशी संपर्क साधावा असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.