भव्य लोकार्पण व भूमिपूजन सोहळा साठी बुलढाणा नगरी सजली…
मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री आज बुलढाण्यात..

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- गेल्या कित्येक दिवसापासून या दिवसाची वाट पाहणारा दिवस आज आला. भव्य दिव्य असा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा आज 19 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
भारतातील सध्या स्थितीत सर्वात उंच अश्वारूढ जमिनीपासून 51 फूट उंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे यासह बुलढाणा शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे उद्घाटन सुद्धा करण्यात येणार आहे त्यानंतर शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान कार्यक्रम शारदा ज्ञानपीठ शाळेच्या मैदानावर घेण्यात येणार आहे. संपूर्ण बुलढाणा नगरी सजलेली आहे.18 सप्टेंबर रोजी भव्य लेझर लाईट व डीजे शोने फेडली डोळ्याची पाळणे ऐतिहासिक सुवर्णक्षण महापुरुषांच्या स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात येणार आहे. भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा शासकीय कृषी महाविद्यालय बुलढाणा तसेच मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा हे राहणार आहे.
कार्यक्रमाची प्रमुख उद्घाटन उद्घाटक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वंशज सातारा श्री छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वंशज कोल्हापूर श्री छत्रपती युवराज संभाजी राजे,तजांवरच्या मराठा राज घराण्याचे प्रमुख श्री छत्रपती बाबाजी राजे, केंद्रीय मंत्री आयुष मंत्रालय श्री प्रतापरावजी जाधव, केंद्रीय राज्यमंत्री युवा कल्याण व क्रीडा भारत सरकार श्रीमती रक्षाताई खडसे, वन व सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर जी मुनगंटीवार, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप जी वळसे पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहे.
प्रमुख उपस्थितीमध्ये सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय रायमुलकर, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता ताई पाटील, खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर, मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे, शिक्षक आमदार विधान परिषद किरण सरनाईक, आमदार विधान परिषद वसंत खंडेलवाल हे उपस्थित राहणार आहे.