राहुल बोंद्रे यांचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांशी झटापट ! शेतकऱ्यांनी रक्ताच्या सहीने लिहिलेले निवेदन फाटले..
काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांना अटक

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्यावेळापूर्वी बुलढाणा शहरात दाखल झाले मात्र काही क्षणातच काँग्रेसने ठरल्याप्रमाणे जास्त चौकामध्ये येऊन निषेध आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यासाठी राहुल बोंद्रे गेले असता पोलिसांनी राहुल बोंद्रे यांना अडविले झटपट झाली यामध्ये देण्यासाठी आणलेले निवेदन फाडण्यात आले. पोलिसांशी राहुल बोंद्रे सर काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांची झटपट झाली मात्र यामध्ये सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी यांना घटनास्थळावरून डिटेक्ट करण्यात आले.
यामध्ये सकाळीच काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना राहत्या घरून पोलिसांनी सकाळी डिटेक्ट केले. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री आले असताना जयस्तंभ येथे त्यांना काळी झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. यामध्ये अटक करण्यात आलेले काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके, काँग्रेसचे संजय राठोड यासह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना अटक करण्यात आले आहे