ह. भ .प गुरुवर्य, रामाचार्य, विदर्भ रत्न संजय महाराज पाचपोर यांना या वर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान

मलकापूर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- समाजाचं प्रबोधन करून त्यांना संतांच्या विचारांशी एकरूप करण्याचं काम करणाऱ्या वारकऱ्यांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी ‘महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय’ तर्फे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला संताचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि गौरव करण्यासाठी अत्याआनंद होत होत आहे असे मत आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केले.अशा संताचा पुरस्कार देऊन गौरव केला ज्यांनी आपल्या वेगळ्या शैलीतून या वारकरी परंपरेची सेवा केली ते श्री.ह.ब.प.गुरुवर्य रामायणाचार्य,विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर (गुप्तेश्र्वर आश्रम शिर्ला नेमाने) यांना यावर्षीचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी सर्व वारकरी संप्रदायाची मंडळी उपस्थित होते.