सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर..

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा शहरातील विश्राम भवन येथे आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासह मेहकर चिखली या ठिकाणी सुद्धा रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे
या रक्तदान शिबिराला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी भेट दिली. सकाळी दहा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत हे भव्य दिव्य असे रक्तदान शिबिर सुरू होते. कर्मचाऱ्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊन आपले रक्तदान केले आहे. रक्तदान करताना सर्वांमध्ये मोठा उत्साह दिसून आला हे रक्तदान शिबिर आयोजन जिल्हा कंत्राटदार संघटना बुलढाणा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राऊत यांनी स्वतः या शिबिरात सहभागी होऊन आपले रक्तदान केले आहे. वरिष्ठ लिपिक भूषण खेडेकर, JE अनिल रहाणे, शासकीय कंत्राटदार राम सरोदे, शासकीय कंत्राटदार रोहन सरोदे, लिपिक किशोर गवई यांच्यासह अनेक कर्मचारी तसेच कंत्राटदार यांनी आपले रक्तदान केले आहे.