Homeबुलढाणा (घाटाखाली)

जड अंतःकरणाने मलकापूर शहर पोलिसांनी दिले बाप्पाला निरोप…!

Spread the love

मलकापूर :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-  नेहमी ऑन ड्युटी २४×७ तास जनतेच्या सेवेसाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा वसा घेऊन काम करीत असलेल्या पोलिसांना स्वत:च्या घरच्या सण साजरा करण्यासाठी जाण्यापेक्षा आपले कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी महत्त्वाची वाटते.

गणेश उत्सव असो किंव्हा कोणता ही सन उत्सव म्हटल्यावर सर्वात अगोदर जबाबदारी येते पोलिस अधिकारी व कर्मचारी वर या वर्षी आलेल्या प्रत्येक हिंदूच्या घरात व मंडळात विराजमान होणार गणपती बाप्पा उत्सवात कुठे काही घटना घडू नये या साठी राहावे लागते सज्ज त्या मुळे वर्दीतील अधिकारी व कर्मचारी स्वतच्या घरी विराजमान असलेल्या गणरायाला व परिवाराला सोडून निघतो गावातील शांतता व सुव्येवस्था कायद्याचे संरक्षण जबाबदारीच्या कर्तव्यावर त्यावेळी भूक तहान झोप व पारिवारिक कर्तव्य सर्व विसरून फक्त कर्तव्य लक्षात ठेऊन आपली डीवटी व जबाबदारी पार पाडतो

अनेक ठिकाणी अनेक उत्सवात काही समाज कंटक या उत्सवात बाधा टाकतात त्याचे परिणाम अधिकाऱ्यांना भोगावे लागतात काही अधिकाऱ्यांची बदली होते तर काही अधिकाऱ्यांचे निलंबन होते अनेक वर्ष इमानदारीने काम केल्यावरही एखाद्या उत्सवात चुकी नसताना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याच्या प्रयत्नात काही पोलीस कर्मचारी व वर्दीधारींना आपली वर्दी सुद्धा मुकावी लागली आहे अशा परिस्थितीत अनेक वर्दी मधील अधिकारी राजकीय षड्यंत्राचा बळी पडल्याचे चित्र सद्या झालेल्या जलगाव जामोद व शेगाव मध्ये झालेल्या दगड फेक मध्ये एस डी पी ओ गवळी याचे निलंबन दिसून आले  विघ्नहर्ता म्हणजे अर्थात गणपती या वर्षी मलकापूर पोलिसांनी पोलिस स्टेशनच्या परिसरात गणेशाची स्थापना केली बाप्पा नी वर्दीतील माणसावर ही दया दृष्टी ठेवावी तसेच सन उत्सवात काम करते वेळी संकट समई बाप्पांनी आमचे संरक्षण करावे या हेतूने मलकापूर ठाणेदार गणेश गिरी यांनी गणेशाची स्थापना करून दहा दिवस गणेशाची पूजा अर्चना करून अत्यंत भक्ती भवानी गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी विधीवत पूजन करून मलकापूर शहरातील मुख्य मार्गावरून गणेशाची विसर्जनाची मिरवणूक मध्ये वर्दीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हातातल्या काठ्या खाली ठेवून त्यांच्या हातात टाळ मृदुंग घेऊन भजन म्हणत एखाद्या वारकऱ्यासारखे दोन लाईनीमध्ये गणेशाची मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला तसेच यावेळी मलकापूर शहरात गणेश मंडळाच्या भक्ताकडून हा गणेशोत्सव शांततेत पार पाडल्यामुळे गणेशचे भक्तांचे आभार सुद्धा मानले तसेच शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करून गणेशाला निरोप दिला यावेळी गणेश विसर्जन सोहळ्या त मलकापूर पोलीस स्टेशन मधील ठाणेदार गणेश गिरी सहकारी कर्मचारी व महिला कर्मचारी अनेकांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page