केंद्र आणि राज्यांमध्ये समविचारी पक्षाचं सरकार असेल तर विकासाच्या कामांना गती मिळते :- केद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- केंद्र आणि राज्यांमध्ये समविचारी पक्षाचं सरकार असेल तर विकासाच्या कामांना गती येते हे गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यातील जनतेने अनुभवले आहे . त्यामुळे भविष्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीतही भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच क्रीडा व युवक राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचा नागरी सत्कार कार्यक्रम आणि महायुती घटक पक्षाचा मेळावा २१ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार चैनसुख संचेती उपस्थित होते यावेळी बोलताना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील एकनाथराव शिंदे यांच्या सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले आहेत ते निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे , महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या अस आवाहन त्यांनी यावेळी केला राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना अतिषय लोकप्रिय होते ही योजना सर्व सामान्य महिलाच्या हीताची आहे केंद्र सरकारने महिलांच्या बाबतीत ही सकारात्मक निर्णय घेतले आहे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने 50% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे 2029 च्या निवडणुकीमध्ये महिला लोकप्रतिनिधी संख्या ही पुरुषांच्या बरोबरी राहणार आहे.
येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीत कार्यकत्यानी गाफील न राहता महायुतीचा उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी निवडुण आणण्यासाठी कामाला लागा असे आवाहन केद्रीय युवक कल्याण क्रिडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले यावेळी नागरीकांच्या वतीने दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला या मेळाव्याला महायुती घटक पक्षाचे पदधिकारी सदस्य उपस्थिती होते.