पत्रकार बांधवांना तर्फे दोन्ही केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार…!

मलकापूर:- आपला बुलढाणा जिल्हा बातमी रावेर लोकसभा मतदार संघामध्ये विजयाची हॅट्रीक केल्याने व नुकत्याच तीन महिन्यापुर्वी केंद्रीय मंत्री मंडळामध्ये निवड झालेल्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री ना.श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांचा व बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र ना. प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा विजय संपादन केल्याने त्यांची सुध्दा केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री पदी निवड झाल्याने आज दि.21 सप्टेंबर रोजी मलकापूर नगरीमध्ये या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्री मंत्र्यांचा भव्य जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा सत्कार करतांना दै. देशीन्नतीचे तालुका प्रतिनिधी हरीभाऊ गोसावी, मलकापूर आजतक चे संस्थापक संपादक विरसिंहदादा राजपूत, पत्रकार करण झनके आदी उपस्थित होते.